Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसुकेणेत बिबट्याची दहशत

सुकेणेत बिबट्याची दहशत

कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe Sukene

दोनच दिवसांपूर्वी कसबे सुकेणे येथे स्टिंग ऑपरेशन करत बिबट्या वनविभागाने जेरबंद केला असतानाच आज परत मौजे सुकेणे येथील संजय पोपटराव मोगल यांच्या वस्तीवर पहाटे बिबट्याने कुत्र्याला ठार केले. मौजे सुकेणे परिसरात बिबट्याप्रवरण क्षेत्र निर्माण झाले आहे का? हाच प्रश्न आता परिसरातील नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

या बिबट्याची मोठी दहशत मोगल कुटुंबाने पाहिली. ही घटना पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. कुत्र्याचा अचानक आवाज आल्याने मोगल कुटुंबीय दरवाजा उघडून शेडकडे बघत असतानाच बिबट्याने तोपर्यंत कुत्र्याची शिकार करून ओढत नेत असल्याच चित्र मोगल कुटुंबियाला दिसून आले.

येथून जवळच असलेल्या भरत मधुकर राहणे या शेतकर्‍याचा पाळीव कुत्रा बिबट्याने ओढून नेऊन ठार केले. प्रत्यक्ष दर्शनीनुसार मौजे सुकेणे- चांदोरी शिवावर एक बिबट्या व दोन बछडे असून हा बिबट्या मादी असल्याची शक्यता आहे. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर सुरू असून रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने पिकांना पाणी देणे शेतकर्‍यांना भाग पडते.

मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे. या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. वनविभागाने यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करत कसबे सुकेणे व मौजे सुकेणे परिसरातील शेतकर्‍यांची होणारी कुचंबना थांबवावी.

सुकेणा-चांदोरी शिवावर मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असून दररोज कोणाला ना कोणाला हे बिबटे नजरेस पडत आहे. या बिबट्यांच्या धाकाने शेतात मजूर येण्यास धजावत नाही. दिवसा वीजपुरवठा नसल्याने रात्रीचा वीजपुरवठा असल्याने पिकांना पाणी देणे ही अडचणीचे ठरत आहे. या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
संजय मोगल, नागरिक, मौजे सुकेणे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...