Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकसबे सुकेणेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe Sukene

कसबे सुकेणे पंचक्रोशीतील वडाळी नजीक रस्त्यावरील गट क्रमांक 755 मधील वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतात सोमवारी दुपारी 3 वाजेपासून बिबट्या दडून बसला होता. मंगळवार (दि.4) सकाळी 9.30 वाजेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत बिबट्याला रेस्क्यू करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरु होता. यात विशेष म्हणजे कसबे सुकेणे येथील वन्यजीव संरक्षक शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ जखडून ठेवत जेरबंद केले. शरद जाधव यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून या बिबट्याचा माग घेत अचूक लोकेशन वन्यजीवसंरक्षक शरद जाधव, निफाड वनविभाग, तसेच कसबे सुकेणे आणि ओझर पोलिसांनी मिळविले. त्यांनतर मंगळवारी सकाळी 9.30 वाजेपासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सुरुवातीला जाळीच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यातून बिबट्या निसटला. तिसर्‍या प्रयत्नात शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ पकडले. या दरम्यान वनविभागाने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले व त्यास सुरक्षित ताब्यात घेतले. हा सर्व थरार तब्बल अडीच तास सुरु होता.

निफाड येथील वनपाल भगवान जाधव, विजय दोंदे, विजय माळी, शरद चांदोरे, वैभव जाधव, राहुल गुंजाळ आदींसह पोलीस व स्थानिक शेतकर्‍यांचा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग होता. वनविभागाने पंचनामा करुन बिबट्यास विशेष वाहनाने निफाड येथे नेवून त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली. सदरचा बिबट्या मादी असल्याचे समजते. मादीने दोन दिवसांपूर्वीच शिवाजी भंडारे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार मारले होते. याशिवाय अनेक शेतकर्‍यांच्या पाळीव कुत्र्यांवर देखील या मादी बिबट्याने प्राणघातक हल्ले केले होते. या रस्त्याने ये-जा करणार्‍यांना अनेकवेळा बिबट्याने दर्शन दिले होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...