Saturday, June 15, 2024
Homeनाशिकधुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

निफाड । प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सावरगाव नांदूर खुर्द शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. ओझरखेड डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजूला झाडी झुडपी असल्याने बिबट्यास लपण्यास बरीच जागा होती.

पंधरा ते वीस दिवसांपासून वनविभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यताला होता. आज संध्याकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी व नांदूर खुर्द सावरगाव ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, अजूनही एक बिबट्याचे वास्तव्य तेथे असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या