Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकसामनगाव येथे पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद

सामनगाव येथे पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद

नाशिक । Nashik

दारणाकाठालगतच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास सामनगाव येथे लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद झाला.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून सदर परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. त्यामुळे वनविभागाने यापरिसरात १७ पिंजरे लावले होते. त्यापैकी आज सामनगावातील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. सकाळी बिबट्याने आवाजाने हि घटना नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी वनविभागाला कळवले. काही वेळेतच नाशिक पश्चिम वनविभागाचे वन्यप्राणी रेस्क्यू वाहनासह चालक प्रवीण राठोड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.

बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा तत्काळ घटनास्थळावरून वाहनाद्वारे वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या हलविला. बिबट्या सुस्थितीत असून त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. तुर्तास या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार नसल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या