Friday, May 3, 2024
Homeनाशिककृषिदूताकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

कृषिदूताकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

पाथरे | Pathare

ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषी उद्योग आधारित कार्यक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील (Sinnar) कोळगाव माळ व परिसरातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (Mahatma Phule Agricultural University)

- Advertisement -

संलग्न म वि प्र समाजाचे कर्मयोगी दुलाजी नाना पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी जय कदम कृषी दुताच्या भूमिकेतून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे देत आहे.

शेतात वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन अनेक शेती विषयक नवनवीन प्रयोगात्मक माहिती जय कडून मिळत आहे. रासायनिक खते पाण्याच्या अत्याधिक वापरामुळे शेतीवर होणारा दुष्परिणाम, ठिबक सिंचन पद्धतीचे (Drip irrigation) महत्त्व, सेंद्रिय खताची निर्मिती व वापर, माती- पाणी परीक्षण, चारा प्रक्रिया, पशूपालन -मधमाशी पालन, बीजामृत मोबाईल ॲप द्वारा मिळणारी कृषी विषयक माहिती चा प्रत्यक्ष शेती क्षेत्रात वापर, फळभाज्या पालेभाज्यांचे संगोपन ( fruits and vegetables), शेतमालाची खरेदी विक्री, पाण्याचे व्यवस्थापन, वृक्षावरील विविध कलमे प्रक्रिया, पिकावरील किड रोगाचे नियंत्रण व औषधांचा वापर आदी शेतीशी संबंधित माहिती प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना दिले जात आहे.

याकामी महाविद्यालयाचे प्राचार्य आय. बी. चव्हाण, प्राध्यापक डी.एस. शिंदे, प्राध्यापक एस. बी. सातपुते, प्राध्यापक एस. यु. सूर्यवंशी यांचे सह गावातील प्रगतिशील शेतकरी अंबादास कदम यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे आपल्या गावातील मुलगा देत आहे, याचा सार्थ अभिमान बाळगत कोळगाव माळ ग्रामपंचायतीचे वतीने जय कदम यांचा सत्कारही करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या