Tuesday, April 29, 2025
Homeधुळेधुळे जिल्ह्यात एका रेशन दुकानाचा परवाना रद्द

धुळे जिल्ह्यात एका रेशन दुकानाचा परवाना रद्द

धुळे – Dhule

जिल्हयातील एका स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द आणि चार स्वस्त धान्य दुकाने निलंबीत करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पुरवठा यंत्रणेस तपासणी कामी स्वस्त धान्य दुकानाचे अभिलेख उपलब्ध करुन न देणे, पुरवठा कर्मचारी व ग्राहक यांचेशी उद्धटपणे बोलणे या कारणावरून शिरपूर शहरातील रास्त भाव दुकान क्र. 191 चा परवाना कायमस्वरुपी रद्य केला आहे. तर शिरपूर तालुक्यातील 1 आणि साक्री तालुक्यातील 3 दुकानांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहे.

शिरपूर शहरातील लाभार्थी यांना युनिट प्रमाणे धान्य मिळाले नाही, म्हणुन अरुणा बापू थोरात रास्त भाव दुकान क्र. 191 चे दुकानदार यांच्याविरुध्द शिरपूर येथे तक्रार केली होती. तक्रारीवरुन पुरवठा कर्मचारी यांनी जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची उत्तरे देवून लाभार्थी यांना धान्य देणार नाही, तसेच अभिलेख उपलब्ध करुन देणार नाही, अशा स्वरुपाची उध्दट उत्तरे दिली. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काढलेल्या नोटीशीस देखील उत्तर दिले नाही. म्हणुन श्रीमती अरुणा बापू थोरात रास्त भाव दुकान क्र. 191 चे दुकानदार यांच्या दुकानाचा परवाना कायस्वरुपी रद्द करण्यात आलेला आहे. तर साक्री तालुक्यातील पेटले येथील रास्त भाव दुकान क्र 151 यांचा परवाना ग्राहकांना पावत्या न देणे, तांदुळ व गहू कमी प्रमाणात देणे, इत्यादी कारणावरुन जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालाधीसाठी निलंबीत करण्यात आलेला आहे. याच कारणांमुळे शिरपूर तालुक्यातील अभाणपूर रास्त भाव दुकान क्र. 128, साक्री तालुक्यातील सुतारे दुकान क्र. 210, महिर दुकान क्र. 113 या स्वस्त धान्य दुकानांचे परवाने एका महिन्यासाठी निलंबीत करण्यात आलेले आहेत.

स्वस्त धान्य दुकानदार यांनी सर्व योजनांचे मुदतीत वाटप करावे, तसेच स्वस्त धान्य दुकानातुन कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, गैरव्यवहार करणाऱ्यांविरुध्द कडक करावाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील कंपनीतून सव्वा दोन लाखांच्या स्क्रॅपची चोरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे...