Thursday, May 22, 2025
Homeजळगावपत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

नांदायला येत नाही म्हणून पत्नीच्या (killed his wife) गळ्यावर कोयत्याने वार करुन निर्घृण खून करणार्‍या युवराज कपूरचंद जाधव (husband) (वय-50, रा. पिंपरखेड तांडा, ता. चाळीसगाव) या पतीला गुरुवारी जन्मपेठेची (Life imprisonment) शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश 3 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी एस. वावरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेदMakeup Part 4 # असा करा Self makeup

चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथील माहेर असलेल्या कविता जाधव यांचे पती त्यांना नांदवत नव्हते. पत्नी नांदायला येत नसल्याचा राग युवराज जाधव यांच्या मनात होता. दि. 16 जून 2020 रोजी पत्नी माहेरी गच्चीवर झोपलेली असतांना पती युवराज हा शेजारील घरावर बांबूची शिडी ठेवून त्याठिकाणी आला. त्यानंतर त्याने पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन तीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. युवराज पळून जात असतांना कविता जाधव यांचा भाऊ व मुलाने त्याला पकडून ठेवत एका खोलीत डांबून ठेवले होते. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष ठरली महत्वपुर्ण

हा खटला जिल्हा न्यायाधीश 3 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात सुरु होता. सरकारपक्षाकडून 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयताचा व आरोपीचा मुलगा, मुलगी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार अभिजीत लांडे यांच्या इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. सरकारपक्षाकडून अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी तर पैरवी अधिकारी म्हणून तुषार मिस्त्री यांनी सहकार्य केले.

सव्वा लाखांची दारु नष्टगंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आगवन विभागाच्या कारवाईमध्ये ३० हजाराचा डिंक जप्त

आईच्या अंगावर बसून चिरत होता गळा

मुलीने दिलेल्या जबाबात सांगितले की, तो झोपेत असतांना त्याच्या आईचा हात त्याच्या अंगावर पडल्याने त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले असता, त्याचे वडील हा आईच्या अंगावर बसून कोत्याने मानेवर वार करीत गळा चिरत होता. या जबाबाला मुलाने आपल्या जबानीतून पुष्टी दिली आहे. पुराव्याअंती युवराज जाधव याला दोषी ठरविण्यात आले होते आणि अखेर गुरुवारी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

अशी सुनावली शिक्षा

भादवी कलम 302 खाली जन्मठेपेची शिक्षा व 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना साध्या कैदेची शिक्षा. तसेच आरोपी हा 27 जून 2020 पासून कारागृहात असल्याने तेव्हापासून शिक्षेच्या कालावधीचा विचार केल जाणार असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

गुर्जर समाजाने केला हा आदर्श ठराव

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शिबलापूर येथील कृषी सेवा केंद्र चोरी प्रकरणी तिघांना...

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील पिंप्रीलौकी फाटा शिबलापूर (Shilapur) येथील कृषी सेवा केंद्राच्या (Agricultural Service Centre Theft) गुन्ह्यातील 3 आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB...