Saturday, September 14, 2024
Homeदेश विदेशRain Update : हिमाचलसह पंजाबमध्ये पावसाचा हाहाकार; हजारो कोटींचे नुकसान, अनेकांचा...

Rain Update : हिमाचलसह पंजाबमध्ये पावसाचा हाहाकार; हजारो कोटींचे नुकसान, अनेकांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

देशातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असून उत्तर भारतातील उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा या राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर (Food) आले आहेत. तर हिमाचलप्रदेश आणि पंजाबमध्ये (Himachal Pradesh and Punjab) ढगफुटी झाली असून हिमाचल प्रदेशात हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत.

Saptashrungi Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

तर या मुसळधार पावसामुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागले असून अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या पावसामुळे हिमाचलप्रदेशचे जवळपास १०५० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत एकूण ८० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९२ लोकं गंभीररित्या जखमी झाले असून यामध्ये १३ मृत व्यक्तींचे शरीर आज (दि. १२ जुलै) सापडले आहे.

Saptashrungi Bus Accident : पालकमंत्री दादा भुसेंनी केली जखमींची विचारपूस; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना

तसेच हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण ७९ घरे नष्ट झाले असून ३३३ घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ४१ ठिकाणी भुस्खलन (landslide) झाले असून २९ फ्लॅश फ्लडच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे रस्ते (Road) बंद झाल्याने हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोगाने एसपीएएसची २३ जुलैला होणारी परीक्षा रद्द केली आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, भरधाव खासगी बस ट्रकला धडकली

दरम्यान, पंजाबमध्ये (Punjab) देखील पावसाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चंदीगडमध्ये गेल्या २४ तासात ३२२ मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या २३ वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे बोलले जात आहे. तर चंदीगडमधील डेरा बस्सी येथे अनेक लोक नावेतून प्रवास करताना दिसत असून पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भुजबळांना सिद्धगड, मुश्रीफांना विशाळगड तर मुंडेंना प्रचितगड; NCP च्या ९ मंत्र्यांना मिळालेल्या बंगल्यांची यादी

- Advertisment -

ताज्या बातम्या