अभिनेत्री कैटरीना कैफ (Katrina Kaif) आणि पती अभिनेता विकी कौशलला (Vicky Kaushal) सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अज्ञात व्यक्ती विरोधात मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ (Santa Cruz) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा उल्लेखकी त्याने तक्रारीत केलाय.
दरम्यान कतरिना आणि विकी हे नुकतेच मालदीवला सुट्ट्यांसाठी गेले होते. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त जवळच्या मित्रपरिवारासोबत हे दोघे मालदीवला गेलेले. त्यांनी या दौऱ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले होते.
कतरिना आणि विकीला नेमकी काय धमकी देण्यात आली आहे यासंदर्भातील माहिती सध्या उपलब्ध झाली नाही.
काही आठवड्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रमाणे तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी सलमान आणि त्याच्या वडिलांना एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आली होती.