Thursday, May 2, 2024
Homeनाशिकपवित्र रमजान काळात बदलते जीवनशैली

पवित्र रमजान काळात बदलते जीवनशैली

नाशिक । फारुक पठाण Nashik

रोजा, नमाज, हज, जकात व कलमा हे इस्लाम धर्माचे पाच मूल्य (फर्ज अर्थात अनिवार्य कार्य) आहे. इस्लामचा पाया या पाच गोष्टींवर मजबुतीने उभा आहे. वर्षातील बारा पैकी 9 वा महिना म्हणजे पवित्र रमजान महिना असतो. या काळात मुस्लिम बांधव, महिला, लहान मोठे सर्वजण सुमारे 14 तासांचा रोजा ठेवून प्रार्थना करतात. तर संध्याकाळी इफ्तार रोजा सोडण्यात येतो. यासाठी ओली खजूर, फालुदा, सरबत या पदार्थांची आवश्यकता लागते. दिवसभर निरंक राहिल्याने शरीर कमजोर होते, त्यामुळे अशा वस्तूंचे सेवन केल्यास त्वरित शरीरात ऊर्जा निर्माण होते. इस्लाम धर्माने देखील रोजा सोडण्यासाठी हे पदार्थ घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे धर्माला विज्ञानाची जोड आहे.

- Advertisement -

रमजान महिना सुरू होण्याअगोदरच बाजारात मोठ्या प्रमाणात असे पदार्थ उपलब्ध होतात. मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र रमजान महिना असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 30 दिवसांचा असतो.अरबी शब्दकोशात उपवासाला सौम म्हणतात, म्हणून या महिन्याला अरबीमध्ये माह-ए-सियाम असेही म्हणतात. फारसीमध्ये उपवासाला रोजा म्हणतात.

यावर्षी हा पवित्र महिना 24 मार्चपासून सुरू झाला आहे. रोजाची सुरुवात पहाटे 5 वाजेच्या दरम्यान सहेरीने होते तर साधारण सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान इफ्तारने रोजा सोडला जातो. दिवसभर निरंक उपवास केल्यानंतर संध्याकाळी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार खजूर खावून रोजा सोडला जातो.त्याचप्रमाणे फळे देखील भरपूर खाण्यात येतात.संध्याकाळी सूर्यास्तानंतर मगरिबची अजान झाल्यावर रोजा सोडला जातो, याला इफ्तार म्हणतात. यानंतर पहाटे सहेरीपूर्वी काहीही खाऊ शकतो.

मुस्लिम घरांमध्ये रमजान काळात घरोघरी विविध प्रकारे खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने तळलेल्या पदार्थांचा समावेश असतो.

खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल,आयरन, ग्लुकोज, विटामिन्स असतात. त्यामुळे संध्याकाळी रोजा सोडण्यासाठी खजूर खाण्याचे पैगंबर साहेबांनी सांगितले आहे. त्याला विज्ञानाची देखील जोड आहे. खजूर खाण्याने त्वरित शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत निरंक राहिल्याने शरीरातील ग्लुकोज लेव्हल कमी होऊन जाते.अशा वेळेला खजुरसह लिक्विड इंडेक्ट म्हणजे पातळ पदार्थ जसे दूध, फालुदा, सरबतचे सेवन केल्यास शरीरात त्वरित ऊर्जा निर्माण होते. आपल्या पूर्वजांनी अगदी दूरदृष्टी ठेवून ह्या सगळ्या गोष्टीचे नियोजन करून ठेवले आहे. मुस्लिम बांधव आजही त्याच आदेशाप्रमाणे आपले जीवन व धर्म कार्य करीत असतात. त्यामुळे महिनाभर कमी तापमानात देखील रोजा ठेवून त्रास होत नाही.

डॉ. सादिक शेख, मुस्कान दवाखाना, जुने नाशिक

पहाटे या पदार्थांना पसंती

नान, पाव, दूध रोट, पराठे साबुदाना खिचडी चपाती, भाजी, भात चाय, बटर

सायंकाळी या पदार्थांना पसंती

व्हेज, नॉन व्हेज, समोसे मसाला चने, रगडा, खिचडा कबाब, सिग, विविध प्रकारचे भजे विविध फळे, यामध्ये प्रामुख्याने टरबूज, केळी, सफरचंद, द्राक्ष आदींचा समावेश असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या