Sunday, September 15, 2024
Homeनगरशेवगाव तालुक्यात विजेचा खेळखंडोबा

शेवगाव तालुक्यात विजेचा खेळखंडोबा

शेवगाव (शहर प्रतिनिधी)

- Advertisement -

शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात गेली आठ दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून नागरिक बीज वितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळाच्या कामकाजामुळे हैराण झाले आहेत.

शहरातील खंडोबानगर, वरूर व आखेगाव रस्ता परिसर विजेअभावी गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंधारात आहे. इतर भागातही वारंवार बीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली दिवसभरातील अनेकवेळा तसेच रात्री सुद्धा बीज गायब राहत असल्याने शहरातील नागरिक व छोटे व्यावसायिक यांच्यापुढे अनेक अडचणींचे सावट उभे राहिले आहे.

शासनाने देवस्थाने खुली केल्याने मंदिर परिसरासह शहराच्या बाजारपेठेत हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. त्यात शहर व तालुक्याच्या ग्रामीण विजेच्या लपंडावाला नागरिक वैतागले आहेत.

वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन कायम नॉट रिचेबल राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत असल्याच्या तक्रारी आहेत. शहराच्या जुन्या गावातील वीज वाहक यंत्रणा तसेच ट्रान्सफार्मर गेली अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने आगामी दसरा दिवाळीच्या मोठ्या सणावाराचे दिवस लक्षात घेता वीज वितरण कंपनीने शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत दिरंगाई दिसून आल्यास तीव्र आंदोलन पुकारण्याचा निर्धार जनतेतून व्यक्त होत आहे. तर काही सुजाण नागरिक ग्राहक मंचात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या