Saturday, May 4, 2024
Homeजळगावभरवस्तीत विठ्ठल मंदिरावर वीज पडली

भरवस्तीत विठ्ठल मंदिरावर वीज पडली

वरणगांव फॅक्टरी (varangaon Factory) , ता. भुसावळ (वार्ताहर) –

तालुक्यातील वरणगाव (varangaon) येथील विठ्ठल मंदिरावर (Vitthal temple) वीज पडली,(Lightning struck) परंतु जीवितहानी झाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, सध्या वादळ वारा व विज पडल्याने अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. पण वरणगाव येथे शनिवारी वादळी वार्‍यासह विजांचा गडगडाट (Thunderstorms with thunderstorms) होत असतांना शहरातील भरवस्तीत असणार्‍या जावळे वाड्यातील चिमुकले विठ्ठल मंदिरावर (Vitthal temple) मोठी वीज पडली ((Lightning struck)) होती. यावेळी परिसरातील नागरीक भयभीत झाले होते. परंतु या घटनेने फक्त मंदीराच्या कळसाचे (Head damage) थोडे नुकसान झाले असून इतर कोणतीही हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. केवळ विठ्ठल कृपेमुळेच या ठिकाणी जीवितहानी झाली नसल्याच्या प्रतिक्रिया येथील माजी नगरसेवक सुधाकर जावळे, किरण लोखंडे व रहिवाशांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या