Wednesday, September 11, 2024
Homeनगरलाईक व सबस्क्राईब करण्याच्या नादात घातले चार लाख

लाईक व सबस्क्राईब करण्याच्या नादात घातले चार लाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

फॅशन डिझायनर करणार्‍या एका तरूणीची युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्याच्या नादात चार लाख 13 हजार 900 रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. 26 जुलै ते 30 जुलै दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी 8 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक चौकात राहणार्‍या तरुणीने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

26 जुलै रोजी फिर्यादी तरुणीच्या टेलिग्राम अकाऊंटला एक लिंक आली. तरुणीने सदरची लिंक ओपन केली असता समोरील व्यक्तीने तरुणीच्या टेलिग्रामवर एक मेसेज पाठवून त्यामध्ये एक लिंक पाठवली. त्या लिंकमध्ये तरुणीला एक ऑफर देण्यात आली होती. युट्यूब ओपन करून चॅनलला लाईक व सबस्क्राईब केल्यास तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी ती ऑफर होती. पैसे जमा करण्यासाठी तरूणीने समोरील व्यक्तीला एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक पाठविला होता. सुरूवातीला तरूणीने युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब केल्यानंतर तिच्या खात्यात नऊ हजार 681 रुपये जमा झाले होते.

दरम्यान, 29 जुलै रोजी तरूणीला समोरच्या व्यक्तीने ऑफर प्रिपेड टास्क पाठविल्याने तिने सात व नऊ हजार 100 रुपयांचा बेनिफेटचा टास्क निवडला. टास्क निवडल्यानंतर तो पूर्ण करत असताना तरुणीने समोरच्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या खात्यात एकूण चार लाख 13 हजार 900 रूपये टप्प्याटप्याने पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या