Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Liquor Price Hike: मद्याचा घोट महागणार; राज्यात मद्याचे दर वाढणार, १८०...

Maharashtra Liquor Price Hike: मद्याचा घोट महागणार; राज्यात मद्याचे दर वाढणार, १८० मिली दारुसाठी ‘इतके’ रुपये मोजावे लागणार

मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी देशात बिअरचे दर कमी होणार असल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्याने मद्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, राज्य सरकारचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीकोनात उत्पादन शुल्क विभाग मद्यविक्रीवर कर वाढविण्याचा विचार करत होते. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, मद्यप्रेमींच्या खिशाला झळ बसणार आहे.

कोणते मद्य किती रुपयांना मिळणार?
राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर आता मद्यपींना एका क्वार्टरसाठी म्हणजेच १८० मिली दारुसाठी ८० ते ३६० रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये, देशी दारु ८० रुपयांना १८० मिली मिळणार आहे. तर, विदेशी प्रिमियम ब्रँड ३६० रुपये १८० मिली असेल. यामध्ये प्रत्‍येक ब्रँडनुसार किंमतीमध्ये फरक पडणार आहे.

- Advertisement -

१२२३ पदं नव्याने भरले जाणार
सोबतच, मद्य शुल्कवाढीसह सोबतच सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२३ पदं नव्याने भरले जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या ६ जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम तयारी केली जाणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पोर्नो शेअरिंग महागात; नाशिकमधील आंबटशौकीन सोशल मिडिया...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सोशल मीडिया (Social Media) आणि इंटरनेटच्या (Internet) माध्यमातून लहान मुलांचे अश्लिल फोटो, व्हिडिओ (चाईल्ड पोर्नाेग्राफी) अपलोड आणि शेअर करणाऱ्यांविरुद्ध केंद्र...