पिंपळनेर । वार्ताहर dhule
येथील पोलिसांनी गुजरात राज्यात होणारी मद्य तस्करी रोखली. काल रात्री नवापूर रोडवरील मळगाव शिवारातील कळंबारीत कारला पकडण्यात आले. चालक जंगलात पसार झाला. दहा लाखांची कार व पावणे दोन लाखांची मद्यसाठा जप्त करण्यात आली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मद्यसाठा गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करुन नेला जात होता.
मासिक गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी अवैध धद्यांबाबत तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समुळ उच्चाटन करण्याच्या विशेष सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपळनेर पोलिसांकडून पोलिस ठाणे हद्दीतील आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा सिमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग, नाकाबंदी लावण्यात येवुन तसेच गोपनीय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करण्यात येत होती. काल दि.9 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आंतरराज्य सिमा भागात पेट्रोलींग सुरु असतांना नवापूर रोडवरून पांझर्या रंगाच्या कारमधून अवैधरित्या दारुची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती सपोनि सचिन साळुंखे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
त्यानुसार सपोनि साळुखें यांनी पथकासह पेट्रोलींग करीत असंताना नवापुर रोडवरील मळगाव शिवारातील कळंबारीत संशयीत कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कारवरील चालकाने काही अंतरावर कार थांबवुन जंगल परिसरात पळुन गेला. पोलिसांनी कारजवळ (क्र. जी.जे. 27 बीएस 6487) जावून पाहीले असता कार लॉक आढळून आली. लॉक तोडून तपासणी केली असता मागील सिटवर तसेच डिक्कीमध्ये देशी, विदेशी कंपनीचा मद्यसाठा मिळून आला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम 65 (अ), (ई), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असई बी. आर. पिंपळे हे करीत आहे.
या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोसई भाईदास मालचे, असई लक्ष्मण गवळी, पोहेकॉ कांतिलाल अहिरे, पोहेकॉ प्रकाश सोनवणे, पोकाँ राकेश, पोकॉ संदीप पावरा, पंकज माळी, कैलास कोळी, विजयकुमार पाटील, रविंद्र सुर्यवंशी, पंकज वाघ, नरेंद्र परदेशी यांच्या पथकाने केली.