Sunday, September 29, 2024
Homeधुळेपरराज्यात जाणारा 11 लाखांचा मद्यसाठा जप्त

परराज्यात जाणारा 11 लाखांचा मद्यसाठा जप्त

धुळे । प्रतिनिधी dhule

राज्य उत्पादन शुल्क साक्री विभागाच्या पथकाने पिंपळनेर-दहिवेल रस्त्यावरील ढवळीविहीर गावाजवळ परराज्यात विक्रीसाठी जात असलेली मद्याची वाहतूक रोखली. नऊ लाखांचे वाहन व 11 लाख 35 हजार 560 रूपयांचे विदेशी मद्य व बिअरचे 229 बॉक्स असा एकुण 20 लाख 35 हजार 560 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -

बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना विभागातील अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क, साक्री विभागाचे दुय्यम निरीक्षक बी.एस.चोथवे हे रात्री गस्तीवर असतांना त्यांना पिंपळनेर दहिवेल रोडवर ढवळीविहीर गावाजवळ संशयित वाहन (एमएच 04/ईबी 3062) उभे दिसले. त्यांनी या वाहनाची तपासणी केली असता वाहनात विदेशी मद्य व बिअरचे एकूण 229 बॉक्स आढळून आले. त्याची किंमत 11 लाख 35 हजार 560 रुपये असून सदर माल परराज्यात विक्रीसाठी नेण्यात येणार होता. श्री.चोथवे यांनी नऊ लाखांच्या वाहनासह एकूण 20 लाख 35 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क, साक्री विभागाचे दुय्यम निरीक्षक बी.एस. चोथवे, शिरपूरचे निरीक्षक डी.पी.नेहूल, धुळे भरारी पथकाचे निरीक्षक डी.एल. दिंडकर, दुय्यम निरीक्षक आर.आर.धनवटे, एस.एच. शिंदे, ए.सी.मानकर, एस.एस.आवटे, पी.बी. अहिरराव, आर.बी. लांजेकर, सहायक दुय्यम निरीक्षक श्री.निकुंभे, श्री.फुलपगारे, जवान गोरख व्ही.पाटील, श्री.गोसावी, प्रशांत बोरसे, केतन जाधव, वाहन चालक रवींद्र देसले, राज्य उत्पादन शुल्क विभाग, धुळे यांच्या पथकाने केली. तपास दुय्यम निरीक्षक श्री.चोथवे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या