नवापूर । श. प्र. Navapur
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील चरणमाळ रस्त्यावर बोरझर फाटयाजवळ मुद्देमालासह 12 लाख 96 हजार 560 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
दि.13 जून 2023 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, अधिक्षीका स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नवापूर-चरणमाळ रस्ता बोरझर फाटया जवळ येथे साफळा रचण्यात आला. चरणमाळ घाटाकडून एक बोलेरो पिकअप वाहन येतांना दिसले त्यास थांबवण्याचाइशारा केले असता सदर वाहनचालकाने गाडी थोडया लांब अंतरावर उभी केली. त्याला गाडीथांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन तेथेच थांबवून अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला. सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात इंम्पेरियल ब्ल्युव्हिस्की 180 मि.ली चे 100 बॉक्स (महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले), रॉयल चॅलेज व्हिस्कीचा 180 मि.ली चा एक बॉक्स व टूवर्क बिअर 500 मि.ली तीन चे 19 बॉक्स आढळून आले. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही निरीक्षक डी.एम.चकोर,दुय्यम निरीक्षक पी.एस.पाटील, पी.जे.मेहता, एस.आर.नजन, जवान भुषण चौधरी, हंसराज चौधरी, संदीप वाघ, हितेश जेठे, अविनाशपाटील, धनराज पाटील, अजय रायते, राहुल साळवे, मानसिंग पाडवी, सहा.दु.निरीक्षक मोहन पवार यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास डी.एम.चकोर करीत आहेत. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.