Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबाररायपूर येथे 30 लाखांचा मद्यसाठा जप्त

रायपूर येथे 30 लाखांचा मद्यसाठा जप्त

नवापूर । श.प्र. navapur

तालुक्यातील रायपूर शिवारात अवैधपणे परराज्यात मद्याची वाहतूक करतांना आयशर वाहनाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडले. या वाहनामध्ये 30 लाख 66 हजार 800 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून चार जण फरार झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दि.10 जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, विभागीय उपायुक्त सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षीका स्नेहा सराफ यांच्यामार्गदर्शनाखाली नवापूर-चरणमाळ रस्त्यानजीक ऊसाच्या शेतामध्ये टाटा कंपनीची आयशर सहाचाकी वाहन तिचा (क्र.एमएच 18-796) यावाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये मद्यसाठा आढळून आला. तेथे वाहनासह धनराज कौतिक पाटील, (वय 45, वर्षे रा.उमंड, ता.साक्री), बिभीषण रामलाल सोनवणे (वय-31, रा.कावठी पो.मेहरगाव ता.साक्री) यांना अटक करण्यात आली.

आयशर वाहनासह एकुण 30 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे. सदर गुन्हयात भाविन रमेश कोकणी रा.रायपूर, ता.नवापूर, किरण मनीलाल चौधरी रा.बोरचडी बठी फलीयु, व्यारा, मुन्ना उर्फ मुकेश अश्वीन गावित, रा.टीचकपुरा ता.जि.व्यारा,पुनाभाई भटाभाई भरवाड रा.जमादार फलीया, सोनगड हे फरार आहेत. ही कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 (अ) (ई), 80, 81, 83, 98(2), 108 अन्वयेकरण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरिक्षक प्रशांत पाटील, भरारी पथक नंदुरबारचे एस.आर.नजन, जवान हंसराज चौधरी, भुषण चौधरी, अजय रायते, सहायक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, पो.ह. दिनेश वसुल, नवापूर पो.स्टे, पो.कॉ.आबा खैरनार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासदुय्यम निरिक्षक प्रशांत पाटील करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या