Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामद्याचा ट्रक पळवला; ७४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; निफाड तालुक्यातील घटना

मद्याचा ट्रक पळवला; ७४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; निफाड तालुक्यातील घटना

नाशिक/निफाड | प्रतिनिधी

दिंडोरी येथून गोडाऊनमधून माल घेऊन नांदेडच्या दिशेने जाणारा मद्याचा ट्रक अज्ञात नागरिकांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल पहाटेला घडली होती. यानुसार, निफाड पोलिसांनी विंचूर औद्योगिक वसाहतीतून ट्रक ताब्यात घेतला आहे. तर निफाड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, दिंडोरी येथून काल (दि ९) रोजी पहाटेला एक ट्रक मद्याचे बॉक्स घेऊन नांदेडकडे निघाला होता. हा ट्रक निफाडमार्गे नांदेडकडे निघाला असताना पहाटे दोन ते पाच वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने निफाड तालुक्यातील शिवरे फाटा नजीक पाच ते सहा जणांच्या टोळक्याने चालक आणि त्याच्या पत्नीला बळजबरीने वाहणाखाली उतरविले आणि एका खासगी वाहनात बसवून नेले. तर इतर काही संशयितांनी हा ट्रक पळवून नेला.

दरम्यान, याबाबतची माहिती निफाड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली. यानंतर हा ट्रक त्यांना विंचूर औद्योगिक वसाहतीत आढळून आला. हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये जवळपास ५९ लाखांचे मद्य मिळून आले आहे.

संपूर्ण मद्य वैध स्वरूपाचे असून अद्याप मात्र बिले प्राप्त झाली नसल्याचे निफाड पोलिसांनी सांगितले. जवळपास या ९० ते ९९ टक्के मुद्देमाल हा आपल्याला मिळून आल्याचेही ते म्हणाले.

या घटनेत आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आले असून तिघे मनमाडचे तर एक जन नाशिकचा असल्याचे समजते. अधिक तपास निफाड पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या