Monday, March 31, 2025
Homeनंदुरबारशहादा येथे अपघातग्रस्त कारमध्ये आढळला एक लाखांचा मद्यसाठा

शहादा येथे अपघातग्रस्त कारमध्ये आढळला एक लाखांचा मद्यसाठा

शहादा । ता.प्र. – Shahada

येथील प्रकाशा रस्त्यावरील हॉटेल गुलमोहर समोर अपघात झालेल्या कारमध्ये 1 लाख 13 हजार 650 रुपयांचा अवैध दारुसाठा आढळून आला. कारसह 6 लाख 13 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.10 जून रोजी शहादा येथील प्रकाशा रस्त्यावरील हॉटेल गुलमोहर समोर महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही 300 कार (क्र.एमएच15-जेडी 7210) भरधाव वेगात जात असतांना अपघात झाला. या कारच्या नंबर प्लेटा बनावट आढळून आल्या. या वाहनाची तपासणी केली असता त्यात 51 हजार 85 रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज व्हीस्कीच्या 601 काचेच्या बाटया, 5 हजार 100 रुपये किमतीच्या टयूबर्ग कंपनीच्या टीन बियर, 33 हजार 680 रुपये किमतीच्या इंम्पेरीयल ब्लू कंपनीच्या व्हीस्कीच्या 421 बाटल्या, 23 हजार 885 रुपये किमतीच्या ऑल सिझन रिझर्व कंपनीच्या व्हीस्कीच्या 281 बाटल्या असा 1 लाख 13 हजार 650 रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. वाहनासह 6 लाख 13 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

देवगाव शिवारात अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa नेवासा पोलिसांनी (Newasa Police) देवगाव शिवारामध्ये एका डंपरमधून होत असलेल्या अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....