नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar
राज्य उत्पादन शुल्क विभगाच्या भरारी पथकाने नवापाडा ता.अक्कलकुवा येथे मुद्देमालासह 9 लाख 72 हजाराचा मद्यसाठा जप्त केला आहे. दि.30 जुलै राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबारच्या अधीक्षक श्रीमती स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नवापाडा ता.अक्कलकुवा गावात छापा टाकण्यात आला. गुप्त बातमीनुसार टाकलेल्या छाप्यात कुडाच्या झोपडीत नवापाडा शिवारात टयुबर्ग स्ट्राँग बिअर 500 मि.ली. क्षमतेचे एकुण 300 बॉक्स (7200 पत्री टीन) (हिमाचल प्रदेश निर्मित व हरीयाणा राज्यात विक्रीस असलेले) मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल 9 लाख 72 हजारारंचा आहे. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदर कार्यवाही निरीक्षक डी.एम.चकोर, बी.एस.महाडीक, दुय्यम निरीक्षक एस. आर. नजन, सागर इंगळे, प्रशांत पाटील, जवान हितेश जेठे, संदिप वाघ, एम.के.पवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रामसिंग राजपुत, मानसिंग पाडवी, धनराज पाटील, हेमंत पाटील, संजय बैसाणे, राहुल साळवे यांच्या पथकाने केली. पुढील तपास डी.एम.चकोर करीत आहेत.