Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक २०२४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ६५ उमेदवारांची यादी...

विधानसभा निवडणूक २०२४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ६५ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई । Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणूक २०२४ साठी ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत.

दरम्यान ,मविआत आतापर्यंत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत २८८ पैकी ८५-८५-८५ अशा २५५ जागांवर एकमत झाले असून उर्वरित ३३ जागांचा तिढा मित्रपक्षांशी चर्चा करून सोडविण्यात येईल, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची जी यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यातील काही जागा मित्रपक्षांच्या आहेत, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.

- Advertisement -


नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघातून ठाकरे यांच्या पक्षानं उमेदवारी जाहीर केलीय. सुधाकर बडगुजर (नाशिक पश्चिम), वसंत गिते (नाशिक मध्य) यांना पक्षानं उमेदवारी दिलीय. तर मालेगाव बाह्यमधून शिवसेना नेते दादा भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या