Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Swearing Ceremony : 'हे' खासदार मंत्री होऊन देणार मोदींची साथ

PM Modi Swearing Ceremony : ‘हे’ खासदार मंत्री होऊन देणार मोदींची साथ

टीडीपी, जेडीयूचे प्रत्येकी दोन तर भाजपचे किती?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

भाजपप्रणित एनडीए सरकारचा (NDA Government) शपथविधी सोहळा आज संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्यांच्यासोबत ५० हून अधिक खासदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात भाजपतील प्रमुख नेत्यांसह एनडीएमधील घटक पक्षांच्या खासदारांचाही समावेश आहे. त्यातच आता एनडीएमधील कुठल्या पक्षाचे किती खासदार शपथ घेणार याची यादी समोर आली आहे.

यात एनडीएमधील महत्वाचे घटक पक्ष असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) दोन तर नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाचे दोन खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तेलगू देसम हा पक्ष १६ जागांसह भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष ठरला आहे. तर नितीश कुमारांचा जनता दल (युनायटेड) पक्ष १२ जागांसह किंगमेकर ठरला आहे. या नवीन मंत्रिमंडळात आंध्रप्रदेश आणि बिहारमधून अधिक मंत्री असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नसून त्यांना फक्त २४० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांना भाजपला मागील दोन टर्मपासून आपल्याकडे असलेली खाती घटकपक्षांना द्यावी लागणार आहेत. भाजप आपल्याकडे गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र यासारखी महत्त्वाची मंत्रालये ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात भाजपचेच वर्चस्व पाहायला मिळणार आहे.

भाजप संभाव्य मंत्री यादी

अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, एस. जयशंकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमन, प्रल्हाद जोशी, ज्योतिरादित्य सिंधिया, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह, किरण रिजिजू, मनसुख मांडविया, अश्विनी वैष्णव, बंडी संजय, जी किशन रेड्डी, हरदीप सिंह पुरी, शिवराज सिंह चौहान,शोभा करंदळे, रवनीत सिंह बिट्टू, सर्वानंद सोनोवाल, अन्नपूर्णा देवी, जितिन प्रसाद, मनोहर लाल खट्टर, हर्ष मल्होत्रा, नित्यानंद राय, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, श्रीपाद नाईक, चंद्रकांत पाटील, गिरिराज सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, राव इंद्रजीत सिंह, कृष्णपाल गुर्जर, शंतनू ठाकुर, बी.एल.वर्मा, अजय टमटा, सावित्री ठाकुर

एनडीएतील मित्रपक्षांची यादी

१) तेलुगु देसम पार्टी – राम मोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मासानी २) संयुक्त जनता दल- ललन सिंह, रामनाथ ठाकुर ३) राष्ट्रीय लोकदल -जयंत चौधरी ४) हम पार्टी – जीतनराम मांझी ५) लोक जनशक्ती पार्टी -चिराग पासवान ६) जनता दल (धर्मनिरपेक्ष) – एच डी कुमारस्वामी ७) शिवसेना – प्रतापराव जाधव ८) रिपब्लिकन पार्टी – रामदास अठवले ९) अपना दल – अनुप्रिया पटेल

- Advertisment -

ताज्या बातम्या