Tuesday, July 16, 2024
Homeनाशिकश्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण

श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

द्वारका परिसरातील इस्कॉन (ISKON Temple ) मंदिरात यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा ( Shrikrishna Janmashtami )ऑनलाइन होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यंदा ऑनलाईन होणार असल्याची माहिती इस्कॉन परिवाराच्यावतीने देण्यात आली.

सरकारने अद्याप मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे श्रावण महिना उजाडूनदेखील कुठल्याही मंदिरांच्या आवारात

भाविक उपस्थित राहू शकलेले नाहीत. इस्कॉन परिवाराच्या वतीने दोन दिवसीय जन्माष्टमी सोहळ्यास दि.३० पासून सुरूवात होणार आहे. या सोहळ्याची सांगता मंगळवारी (दि. ३१) होणार आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे ५ वाजता मंगल आरती, सकाळी ८ वाजता श्रीमद भागवत प्रवचन यांचे युट्युब च्या माधयमातून थेट प्रक्षेपण होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, ५ ते ७ या वेळेत विविध भक्तांद्वारे कृष्ण कथा, सायंकाळी ८ वाजेपासून पूज्य राधानाथ स्वामी यांचे प्रवचन, अभिषेक, कीर्तन, महाआरती असा सोहळा होईल.

मंगळवारी (दि. ३१) श्रीला प्रभुपदांचा १२५ वा अविर्भाव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ८ सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजेनंतर प्रवचन सेवा असे कार्यक्रम होणार आहे. भाविकांना या सोहळ्याची अनुभूती ऑनलाइन पध्दतीने घेता येणार आहे.

यासाठी भाविकांनी फेसबुक लिंकवर किंवा यूट्यूब वर प्रक्षेपण पहावे व कोणीही मंदिरात येऊ नये, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या