Saturday, July 27, 2024
Homeनाशिकरामकथेत ‘मी’पणा विरहित जगण्याचे सूत्र - आचार्य श्रेयस बडवे

रामकथेत ‘मी’पणा विरहित जगण्याचे सूत्र – आचार्य श्रेयस बडवे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आयुष्यभर माणूस ‘मी’ आणि ‘माझे’ या भोवतीच गुरफटला जातो; वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा ‘मी’पणा दूर झाला पाहिजे किंवा ‘मी’पणा ‘आपण’मध्ये परिवर्तित झाला पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्र आपल्याला ‘मी’पणा विरहित जगण्याचे सूत्र स्वतःच्या जीवनातून सांगतात.

- Advertisement -

रामकथेचे श्रवण-पठण तो ‘मी’पणा गळून पडावा, यासाठी अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन आचार्य श्रेयस बडवे यांनी केले.बळवंत स. देशपांडे, लक्ष्मण स. देशपांडे आणि उर्मिलाताई देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अ‍ॅड. एस. एल. देशपांडे आयोजित रामकथा ज्ञानयज्ञाचे सातवे आणि सांगतेचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आचार्य बडवे पुढे बोलताना म्हणाले, रामायण येणार्‍या पिढ्यांच्या जीवनाला उभे करणारी कथा आहे. त्यामुळे प्रतीकात्मकता समजून घेत आपण संवादसेतू उभा केला पाहिजे. रामायण हे त्यासाठी आवश्यक आहे. लंका ही नुसती नगरी नसून ती एक वृत्ती आहे. आपल्या चित्तवृत्ती विशाल होण्यासाठी रामकथा चिंतन आवश्यक आहे.

प्रभू रामचंद्राची भूमिका ही अत्यंत विशाल असून मानव्याच्या सर्व परिसीमा ओलांडून ते देवत्वाच्या दिशेने गेले आहेत. चारित्र्यसंपन्नता ही रामचंद्रांच्या जीवनातील सर्वोच्च गोष्ट असून त्याच बळावर त्यांनी जीवनातील अगणित लढाया जिंकलेल्या आहेत. कथेच्या सांगतेनिमित्त रामकथेतील शेवटचा भाग रामराज्याभिषेकाचा असल्याने यावेळी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. सुमुखी अथणी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. यावेळी आचार्यांना मानसी बडवे, स्वप्निल परांजपे (हार्मोनियम), भालचंद्र बाळ (तबला) यांनी साथसंगत केली. शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या