Thursday, June 20, 2024
Homeजळगावएचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या 10 जणांच्या जीवनात फुलणार विवाहाच्या आनंदाचे क्षण

एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या 10 जणांच्या जीवनात फुलणार विवाहाच्या आनंदाचे क्षण

अमळनेर Amalner प्रतिनिधी

- Advertisement -

जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे झालेल्या एचआयव्हीसह जीवन (Living with HIV) जगणाऱ्याच्या वधू वर परिचय (Bride and groom should meet)मेळाव्यात दहा जणांचा विवाह (Marriage was arranged) ठरला आहे. यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलणार आहेत. या मेळाव्यात 101 व्यक्तीने आपला परिचय दिला.

अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व शिव अस्तित्व सेवा फाउंडेशन यांच्यावतीने जळगाव येथील अल्पबचत भवन मध्ये हा मेळावा झाला. या वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन सहज फाउंडेशन अध्यक्ष सरिता माळी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या वधू वर मेळाव्यासाठी गुजरात, अहमदाबाद, सुरत, नाशिक, धुळे, औरंगाबाद, पुणे, मुंबई, अकोला, परभणी, धाराशीव, नांदेड, वाशिम, अशा विविध जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीनी आपला सहभाग नोंदवला व आपला परिचय दिला.

या कार्यक्रमासाठी आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, शिव अस्तित्व सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सविता साठे, महिला बालकल्याण समिती सदस्या देवयानी गोविंदवार, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्रद्धा चांडक, जिल्हा एड्स नियंत्रक कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, बालकल्याण समिती सदस्य संदीप पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळावा यशस्वी करण्यासाठी आधार बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी विहान काळजी व आधार केंद्राचे बाह्य संपर्क अधिकारी व पदाधिकारी शिव अस्तित्व सेवा फाउंडेशनचे सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या