Sunday, May 26, 2024
Homeनाशिकभारनियमनाचा यंत्रमाग उद्योगास फटका

भारनियमनाचा यंत्रमाग उद्योगास फटका

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात गत अनेक महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे यंत्रमागासह इतर पूरक उद्योग चालू ठेवणे अशक्य बनल्याने यंत्रमाग कारखानदार व इतर व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा करणार्‍या कंपनीने हे भारनियमन त्वरित रद्द करावे अन्यथा यंत्रमागधारक व कामगार वीजबिल भरणार नाहीत. तसेच बिल वसुलीसाठी कंपनीने देखील सक्ती करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी दिला आहे.

- Advertisement -

शहरात सुरू असलेल्या भारनियमनामुळे वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने त्याचा फटका यंत्रमाग कारखान्यांसह यंत्रमागाशी संबंधित असलेल्या इतर व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. tasntaaतासंतास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने यंत्रमाग बंद राहतात. त्यामुळे कामगारांचेदेखील आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

अवेळी होणार्‍या भारनियमनामुळे यंत्रमाग कारखाने चालू ठेवणे व्यावसायिकांना अशक्य झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मालेगाव वीजपुरवठा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी आसिफ शेख यांनी केली. यावेळी असलम अन्सारी, शकील बेग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या