Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात २१३७ कोटींचे पीक कर्ज वाटप

जिल्ह्यात २१३७ कोटींचे पीक कर्ज वाटप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा बॅक व राष्ट्रियकृत बॅकांना 3 हजार 303 कोटी पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले होते.

- Advertisement -

त्यापैकी सर्व बॅकांनी मिळून 2 हजार 137 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एकूण उदिष्टाच्या 65 टक्के इतके कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात आजपर्यंतची पिक कर्ज वाटपाची ही विक्रमी टक्केवारी आहे.

जिल्ह्यात यंदा शेतकर्‍यांना ऐतिहासिक 2137 कोटींचे म्हणजे 64.69 टक्के खरीप पीक कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा तब्बल 614 कोटी म्हणजे 40.23 इतके जादा कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

यंदा करोनाच्या गंभीर संकटात संपूर्ण अर्थचक्र ठप्प झाले आहे. अशा स्थितीत आधीच अडचणीत असलेला शेतकरी अजूनच संकटात सापडला. कर्जबाजारी असताना खरीप तोंडावर आल्यानंतर हाती भांडवल नसल्याने तो कसा तग धरेल यासाठी कृषी मंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे अशी भूमिका घेत सर्वच बँकांना जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कर्ज देण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी यांनी देखील दर आठवड्याला पीक कर्ज वितरणाची आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली. कारवाईचा दम देत या बँकांकडून अधिकाधिक कर्ज वितरित करून घेतले. त्याची परिणीती जिल्हयातील शेतकर्‍यांना यंदा आतापर्यंतचे उच्चाकी 2137 कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे.

जिल्ह्यास यंदा 3303 कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्याच्या तुलनेत हे 64.69 टक्के इतके कर्ज वितरित झाले. तर मागील वर्षी 3147 कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्याच्या तुलनेत 1523 कोटी म्हणजे 48.41टक्के इतकेच वितरित करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या