Friday, October 9, 2026
Homeक्राईमCrime News : कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने 8 लाखांची फसवणूक

Crime News : कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने 8 लाखांची फसवणूक

संगमनेरच्या सेवानिवृत्त व्यक्तीची सायबर पोलिसात फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बजाज फायनसर्व्हच्या माध्यमातून एक कोटी रूपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून संगमनेर येथील सेवानिवृत्त व्यक्तीची 8 लाख 1 हजार 600 रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन मोबाइलधारकांसह संबंधित बँक खातेधारकांविरूध्द मंगळवारी (6 ऑक्टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

गुंजाळवाडी रस्ता, संगमनेर येथे राहणार्‍या 69 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी बजाज फायनसर्व्हचे मॅनेजर असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आदित्य बिर्ला आणि केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी काढण्यास सांगितले. ही पॉलिसी काढल्यानंतर बजाज फायनसर्व्हकडून एक कोटी रूपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली संशयितांनी फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेतले.

अशा प्रकारे एकूण 8 लाख 1 हजार 600 रूपये घेतल्यानंतरही त्यांना कर्ज मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. हा प्रकार 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सायबर पोलीस ठाण्यात 6 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी अवघी एकाची माघार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दखल झालेले आहे. छानणीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर पहिल्या दोन...