Tuesday, September 8, 2026
HomeनगरAhilyanagar : यादी जाहीर, पण कर्जमाफीचे ऑनलाईन पोर्टल हँग!

Ahilyanagar : यादी जाहीर, पण कर्जमाफीचे ऑनलाईन पोर्टल हँग!

नगरच्या पहिल्या यादीत 70 हजार ते 1 लाख शेतकर्‍यांचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 16 लाख 96 हजार पात्र शेतकर्‍यांची तिसरी यादी शुक्रवारी रात्री उशीरा सहकार विभागाने जाहीर केली. या यादीत नगर जिल्ह्यातील 1 हजार 378 गावातील शेतकर्‍यांची सोसायटीनिहाय नावे आहेत. कर्जमाफीत नावे आलेल्या शेतकर्‍यांची यादी सहकार विभागाने जिल्हाभर गावोगावी पाठवली असली तरी पहिल्या दिवशी यादीतील नावानूसार आधार प्रमाणिकरणार्‍यांना शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणीला समोरे जावे लागले. तसेच पहिल्यादिवशी कर्जमाफीच्या यादीविषयी माहिती नसल्याने अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरणाला फारसा उत्साह दिसला नाही.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री सहकार विभागाने नगर जिल्ह्यातील 1 हजार 378 गावातील कर्जमाफीत नावे असलेल्या शेतकर्‍यांची यादी जिल्हा बँक, सेवा सोसायट्या, ग्रामपंचायतींकडे पाठवली. तसेच शनिवारी सकाळी या याद्या प्रसिध्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी सकाळी कर्जमाफीत पात्र असणार्‍यांची नावांची यादी गावोगावी प्रसिध्द करण्यात आल्या. त्यानंतर यादीत नावे असणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यास सांगण्यात आले. मात्र, अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या यादीबाबत माहिती नसल्याने शनिवारी दिवसभर जिल्हाभरातील आपलं सरकार केंद्रावर शेतकर्‍यांनी फारशी गर्दी केली नसल्याचे सांगण्यात आले.

तसेच ज्या शेतकर्‍यांची यादीत नावे आली होती. त्यांना आपलं सरकार केंद्रात सरकारच्या कर्जमाफीच्या ऑनलाईन पोर्टलवर जावून आधार प्रमाणीकरण करतांना तांत्रिक अडचणीला समोरे जावे लागले. यात संबंधीत शेतकर्‍यांचे सहकार विभागाच्या यादीत नाव असतांना ऑनलाईन पोर्टलवर कर्जखात्याची माहिती उपलब्ध न होणे, शेतकर्‍यांच्या कर्जखात्याचे थंब न होणे, कर्जखात्याचे आधार प्रामणीकरणाची पावती तयार न होणे यासह अन्य तांत्रिक अडचणींचा समावेश असल्याचे शेतकर्‍यांसह आपलं सरकार केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. यंदाच्या कर्जमाफीत पात्र लाभार्थ्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडी) देण्यात आलेला असून शेतकरी आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण करण्यात सांगण्यात आले आहे.

राज्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या 17 लाख शेतकर्‍यांना सुमारे 13 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर आणि कर खात्यासंबंधात काही तक्रार नसेल तर शेतकर्‍यांच्या खात्यात विनाविलंब जमा केली जाणार आहे. उर्वरित थकबाकीदारांच्या याद्यांची पडताळणी सुरू असून, त्यांनाही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक कर्जदाला विशिष्ट क्रमांक
सरकारच्यातवतीने कर्जमाफीच्या यादीत नावे असणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्या शेतकर्‍यांचा नाव आणि आधार क्रमांक, कोणत्या बँकेचे कर्ज आहे. तिची शाखा, कोणत्या विकास सोसायटी मार्फत कर्ज घेतले, तेथील कर्ज खाते क्रमांक, कर्जमाफीची रक्कम आणि संबंधीत शेतकर्‍यांचा मोबाईलनंबर याबाबतचा तपशील आहे. ही माहिती जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय आणि तालुकानिहास स्वतंत्रपणे असून या माहितीचे शनिवारी दिवसभर जिल्हा बँक आणि सहकार विभागाकडून एकत्रिकरण सुरू होते.

पाच हजार खात्याचे प्रामाणिकरण
जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या याद्याबाबत माहिती नाही. सहकार विभागाकडून याबाबत पुरेशा प्रमाणात गाजावाजा करण्यात आला नाही. यामुळे शनिवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यात आपलं सरकार केंद्रावर शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले नाही. जिल्ह्यात पहिल्या यादीत 70 हजार ते 1 लाख शेतकर्‍यांची नावे आलेली आहेत. यातील साधारण 5 हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्याचे आधार प्रमाणिकरण झाल्याचे सांगण्यात आले. उद्या सोमवारपासून मोठ्या संख्याने शेतकरी कर्जखात्याचे प्रमाणिकरण करण्यात येतील अशी शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Accident News : कार-दुचाकीचा भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू,...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar तालुक्यातील अंबोली-वेळुंजे रस्त्यावरील (Amboli-Welunje Road) मोहनबाबा हागोटे वस्ती परिसरात शनिवारी रात्री ८:१५ वाजता कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला....