Thursday, November 5, 2026
HomeनगरAhilyanagar : दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना डबल दिलासा

Ahilyanagar : दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना डबल दिलासा

दुष्काळी मदतीसह कर्जमाफीचे पैसे थेट खात्यात || जिल्ह्यातील 1.43 लाख शेतकर्‍यांना 1369 कोटींची कर्जमाफी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 293 शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत 1 हजार 369 कोटी 69 लाख रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1 लाख 24 हजार 286 शेतकर्‍यांच्या खात्यांवर 1 हजार 158 कोटी 71 लाख रूपये, तर राष्ट्रीय व व्यापारी बँकांमधील 19 हजार 7 शेतकर्‍यांच्या खात्यांवर 210 कोटी 98 लाख रूपये जमा झाले आहेत. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, राज्य शासनातर्फे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेली 5 हजार रुपयांची अग्रिम मदत आतापर्यंत राज्यातील 73 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली असून, येत्या दोन दिवसांत 95 टक्के लाभार्थ्यांपर्यंत ती पोहाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सुमारे 12 लाख 15 हजार शेतकर्‍यांच्या नुकसानीचा पंचनामे सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्यातील 4 लाख 90 हजार 396 शेतकर्‍यांच्या खात्यात 5 हजार रुपयांची अग्रिम 245 कोटी 20 लाख रूपये जमा झाली असून उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम दोन तीन दिवसांत जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झालेल्या 1 लाख 58 हजार 188 शेतकर्‍यांपैकी 1 लाख 46 हजार 893 शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे प्रमाण 92.86 टक्के इतके आहे. उर्वरित शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कर्जाची थकबाकी असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्‍या पात्र शेतकर्‍यांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 2 लाख 30 हजार 109 शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांची माहिती महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना बायोमेट्रिक पध्दतीने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी काढणेही अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेच्या यादीत नाव असलेल्या; मात्र आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडीची प्रक्रिया अद्याप पूर्ण न केलेल्या शेतकर्‍यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी शुल्क आकारण्यास मनाई
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकर्‍यांना आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे प्रमाणीकरण करताना शेतकर्‍यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना संबंधित सेवा केंद्रांना देण्यात आल्या आहेत. यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या; मात्र अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या शेतकर्‍यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. त्यापूर्वी संबंधित बँक अथवा वित्तीय संस्थेकडे जाऊन 31 मार्च 2026 रोजीची थकीत कर्जरक्कम तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Bribery News : लाच घेताना प्राचार्याला रंगेहाथ पकडले

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र ज्ञानमंदिराला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घारगाव (ता. संगमनेर) येथे समोर आली आहे. येथील रंगदास स्वामी शिक्षण विकास...