Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनिवडणुक निकालांआधीच राज्यात महायुतीची गाडी सुसाट; 'या' महापालिकांमध्ये बिनविरोध उमेदवार निवडले

निवडणुक निकालांआधीच राज्यात महायुतीची गाडी सुसाट; ‘या’ महापालिकांमध्ये बिनविरोध उमेदवार निवडले

मुंबई | Mumbai
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ग मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जात आहे. भाजपने कल्याण डोंबवलीतून विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे, 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये 9 उमेदवार बिनविरोध करत महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.

राज्यातील २९ महानगर पालिकांच्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान आहे. तर १६ तारखेला मतमोजणी आहे. या आधीच ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत भाजपाच्या पहिल्या उमेदवार रेखा राजन चौधरी बिनविरोधी विजयी झाल्या आहेत. त्यातच आता कल्याण डोंबिवलीत भाजपानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मतदानाआधीच लढाई जिंकली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत शिंदे शिवसेनेचे तीने उमेदवार विजयी झाले आहेत. यात पॅनेल क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी यांचा समावेश असून ते बिनविरोध विजयी झाले आहेत.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना महायुतीने मतदानापूर्वीच घोडदौड सुरु केली आहे. कारण, भाजपचे ५ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध निवडले आहेत. त्यामुळे १२२ सदस्यसंख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ६२ जागांपासून महायुती आता केवळ ५३ जागा दूर आहे. मतदानापूर्वीच महायुतीने सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. आधी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

मोठी बातमी! भाजपच्या अधिकृत उमेदवाराला निवडणुकीतून माघारीची नामुष्की; पहलगाम हल्ला, फडणवीसांवर टीका करणं भोवलं

कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा डंका पाहायला मिळाला. कारण, शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी ठरले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची खेळी यशस्वी ठरली. पॅनेल क्र. 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग क्रमांक 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार राजेश मोरे यांचे ते चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ह्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

धुळ्यात भाजपने उघडलं खातं
धुळ्यात भाजपाचा तिसरा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आला आहे. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 (ब )मधून भाजपाचे सुरेखा चंद्रकांत ओगले बिनविरोध निवडून आले आहे. माघारीच्या पहिल्याच दिवशी विरोधी उमेदवाराने माघार घेतल्याने सुरेखा चंद्रकांत ओगले यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहिल्यानगरमध्ये अजित दादांचा धुराळा
अहिल्यानगरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) विजयाचे खाते अत्यंत नाट्यमयरीत्या उघडले. प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये कुमार वाकळे यांच्या विरोधात केवळ अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा अर्ज वैध ठरला होता. मात्र, कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वाकळे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर प्रभाग १४ मधून प्रकाश भागानगरे यांचीही बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वीच दोन जागा खिशात घातल्या आहेत.

जळगावात शिंदे सेनेचे उमेदवार विजयी
जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा दुसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. प्रभाग ९ (अ) मधील अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे मनोज सुरेश चौधरी हे बिनविरोध विजयी झाले आहे. सकाळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ.गौरव सोनवणे बिनविरोध विजयी झाले होते. माघारीच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘महसूल’चा सुधारित आकृतीबंध मंजूर

0
मुंबई, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. या...