Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रअंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | Mumbai

रेल्वेमध्ये दररोज अपघातांची मालिका सुरूच असून प्रवाशांचा प्रवास असुरक्षित होऊ लागला आहे. त्यातच आज अंबरनाथ येथे लोकल रेल्वे रुळावरून घसरली आहे. सुदैवाने ही लोकल संपूर्ण खाली होती. शिवाय मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने लोकल सेवाही कमी करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले… वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?

मात्र यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने होतं आहे. रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.जो डब्बा रुळावरून घसरलेला आहे, त्याला वेगळं करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत झाला आहे.

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

दरम्यान, आज रविवार असल्याने सरकारी आणि अनेक खासगी कार्यालये बंद आहेत. त्यामुळे चाकरमानी आज घरीच होते. वर्किंग डेच्या दिवशी जर ही घटना घडली असती तर चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते. आज जरी चाकरमानी घरी असले तरी अनेक लोक मुंबई किंवा कर्जतला जात असतात. त्यांना मात्र याचा फटका बसला आहे. रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...