Saturday, May 4, 2024
Homeनाशिकशेती व्यवसाय खातोय 'लॉकडाऊन'चे धक्के

शेती व्यवसाय खातोय ‘लॉकडाऊन’चे धक्के

आतबट्ट्याचा व्यवसाय ठरलेल्या शेतीला या आर्थिक वर्षात ‘लॉकडाऊन’चा मोठा फटका बसला. शेतमाल घरातच पडून राहणे , विक्रीसाठी पर्याय उपलब्ध नाही. बिकट परिस्थितीत तरुण शेतकऱ्यांनी कल्पक प्रयोग राबवत नुकसान टाळले. मात्र,बहुतांशी शेतकऱ्यांना ‘ लॉकडाऊन ‘ची झळ सोसावी लागली. अजूनही याची झळ सोसावीच लागत असून सद्याची परिस्थिती पाहता लॉकडवूनची टांगती तलवार कायम आहे.

मागील लॉकडाऊन नंतर शेती सोडून सर्वच क्षेत्रातील लोकांनी आपल्या मालाचा भाव 25 ते 50 टक्के वाढवला आहे.आज दुचाकी 20 ते 50 हजारांनी तर चारचाकी 1 ते 3 लाखानी किमती वाढल्या आहेत. करोनाच्या आधी ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये मंदी होती. हीच परिस्थिती सिमेंट लोखंड शेती औजारे खते बियाणे कीटकनाशके व डिझेल पेट्रोल च्या बाबतीत आहे.

- Advertisement -

परंतु, आख्या लोकडाऊनच्या काळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना देशाला सावरणाऱ्या बळी राजाला आज दुय्यम वागणूक दिली जाते आहे. गेल्या 3 महिन्यापासून सर्वच भाजीपाला व फळे कवडीमोल भावाने विकला जातोय तरी कुणास खन्त नाही.

नाशिकमधील शेती ही दोन दशकात इतकी खर्चिक झाली आहे की,करून ठेवली आहे. त्यामुळे या शेतीवर आधारित बाजारपेठ ह्या दरवर्षी करोडोची उलाढाल करत आहे पण शेतकरी दिवसोदिवस खड्यात जाताना दिसत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ म्हणजे ‘ हे औषध मारा, हे ब्लोअर घ्या, ती व्हरायटी लावा,ती ड्रीप वापरा’ ह्या सर्व तंत्रज्ञानावर जितका खर्च होतोय याच्या एक टक्काही खर्च कोणी हक्काच्या बाजारपेठेसाठी बाजारभाव मिळावा म्हणून करत नाही हीच परिस्थिती कांदा व इतर भाजीपाला पिकांची आहे.

आजतागायत कोणीही द्राक्ष कांदा किंवा भाजीपाला यांचे भाव पडले म्हणून रास्ता रोको किंवा रेल्वे रोको केला नाही. जर ह्या बाबतीत शेतकरीच गंभिर नसेल तर व्यवस्था कशी बदलणार? साधे एक्सपोर्टचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही.भाव जे कमी झाले ते वाढलेच नाही. जिल्ह्यातील शेतकरी हा शेतीत जगातील सर्वात्तम तंत्रज्ञानाचा वापर करतो ज्याने उत्पादन खर्च खूप जास्त आहे.

त्याप्रमाणे जर बाजारपेठ किंवा बाजारभाव उपलब्ध नसेल तर खरोखरच एवढया महाग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा शेतमाल किती दिवस कवडीमोल दराने दलालांच्या घशात घालायचा? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे.

करोना या संसर्गजन्य आजाराची झळ सर्वच क्षेत्राला बसलीय. शहरातून गावी परतणारे मजूर, कामगार, परप्रांतीय. शहरात भाजीमार्केटमध्ये उगीच होणारी गर्दी, गस्त घालणारे पोलिस, रुग्णांची काळजी घेणारी आरोग्य यंत्रणा, स्वतःचीच काळजी घेणारे शहरवाशीय, गरजूंना मदत करणारे दानशूर असे चित्र सध्या समाज माध्यमांची घरबसल्या दिसतेय.

शहरी संस्कृतीचा प्रभाव असणारे सामान्य जणही पॉझिटिव्ह रुग्णांच्या जाती शोधण्यात मग्न आहेत. असे असले तरी शेतकरी बांधवांवर या आजाराचे काय परिणाम होत आहेत, याकडेही लक्ष गेले पाहिजे.

पुन्हा अवकाळी
आतबट्ट्याचा व्यवसाय ठरलेल्या शेतीला यावर्षी ‘लॉकडाऊन’चा मोठा फटका बसला. शेतमाल घरातच पडून असून, विक्रीसाठी पर्याय उपलब्ध नाही. बिकट परिस्थितीत तरुण शेतकऱ्यांनी कल्पक प्रयोग राबवत नुकसान टाळले, मात्र बहुतांशी शेतकऱ्यांना ‘लॉकडाऊन’ची झळ सोसावी लागली.यातच शनिवारी कळवण,निफाड तालुका पिंपळगाव बसवंत तसेच रविवारीही जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.

आधीच करोनाने शेतीचं पार कंबरडे मोडलं असतांना कमी की काय अजून म्हणून अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. द्राक्ष आणि इतर पिकांसाठी सर्वात घातक ठरणारी गारपीट बघून शेतकरी राजा हतबल होऊ नको….! माझ्या शेतकरी राजा हिंमत हारू नको, धीर धर सगळं ठीक होईल !अशी आळवणी केली जात आहे.

धीर तरी किती दिवस धरायचा
गारपीट आणिअवकाळी पावसाने शेतकरी बंधूच्या राहिल्या साहिल्या अपक्षांवरही पाणी फिरले आहे. आधीच भाव नाही, व्यापारी निर्यातदार माल घेत नाही. शेतकऱ्यांची महावितरण वाले वीज तोडणी करत आहेत. शेतकऱ्यांचे सरकार असून पाठीशी सरकार उभे नाही.निवडणुकीपूर्वी सरकार आल्यावर 3 महिन्यात 7/12 कोरा करू सांगणाराचे सरकार येऊन जवळपास दिड वर्ष झाले तरी द्राक्ष शेतकऱ्यांना कुठली ही मदत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानी वा सुलतानी दोन्ही संकटाना सामोरे जावे लागत आहे. धीर तरी किती दिवस धरायचा शेतकरी त्यातल्या त्यात तरुण शेतकरी पूर्ण हवालदिल झाले पंचनामे न करता तत्काळ शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. तर आणि तरच शेतकरी टिकेल नाही तर शेतकरी अरोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. शेतकरी भिक नाही पण कष्टाचे मागतो. तशी परिस्थिती गंभीर आहे. पण शेतकरी सुध्दा खंबीर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या