Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमShrirampur : श्रीरामपुरात लॉजवर पोलिसांचा छापा

Shrirampur : श्रीरामपुरात लॉजवर पोलिसांचा छापा

एकास अटक || तीन महिलांची सुटका

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील एका लॉजवर अनाधिकृत वेश्याव्यवसाय करणार्‍या रँकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याठिकाणाहुन दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. काल पोलीस उपाधिक्षक जयदत्त भवर यांना शहरातील आदर्श लॉज येथे अनाधिकृतरित्या वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहीती मिळाली. त्यांना मिळालेल्या माहीतीवरुन शहर पोलिसांनी आदर्श लॉज येथे जाऊन छापा टाकला. सदर ठिकाणी धिरज प्रमोद बिंगले (वय 35, रा. रंगोलीगल्ली वार्ड नं.5, श्रीरामपूर) व त्याचा मॅनेजर अहमद शेख हे स्वतः आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडत असल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

सदर कारवाई मध्ये तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी धिरज प्रमोद बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख (रा. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द स्त्रीयांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धिरज प्रमोद बिंगले यास अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहेत.

YouTube video player

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, राम शिखरे, पोलीस उप-निरीक्षक समाधान सोळुंके, आप्पासाहेब हंडाळ, दादाभाई मगरे, दिपक मेढे, अजीत धाराव, आजीनाथ आंधळे, अंबादास आंधळे, सचिन दुकळे, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, मच्छिंद्र कातखडे, मिरा सरग आदींनी पार पाडली.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...