Saturday, April 26, 2025
Homeक्राईमलोढा हाईट्समधील जुगार अड्ड्यावर छापा

लोढा हाईट्समधील जुगार अड्ड्यावर छापा

कोतवालीची कारवाई || आठ जुगारी पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स बिल्डींगमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली. जुगार खेळणार्‍या आठ जणांना पकडले असून त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य, 20 हजारांची रोकड जप्त केली आहे. पोलीस अंमलदार सुरज कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, मंगळवारी (1 ऑक्टोबर) रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

प्रकाश रमणलाल शहा (रा. आनंद पार्क, आनंदी बाजार), सिध्देश संजय भसमे (रा. मल्हार चौक), संदीप बाबुलाल भगुरे ( रा. आदर्श गौतम नगर, रेल्वे स्टेशन), सचिन प्रभाकर परदेशी (रा. बुर्‍हाणनगर, ता. नगर), किसन धर्माय्या बतिन (रा. शेरकर गल्ली, बागडपट्टी), शहाजी रामभाऊ साळुंके (रा. बुर्‍हाणनगर), योगेश तानाजी घोरपडे (रा. सिध्दार्थनगर, नगर), मोहसिन अफजल पठाण (रा. एकनाथनगर, केडगाव) अशी पकडलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत. निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस अंमलदार दीपक रोहकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, अनुप झाडबुके, कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...