Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात १२ डिसेंबरला लोकअदालत

जिल्ह्यात १२ डिसेंबरला लोकअदालत

नाशिक । Nashik

जिल्हा न्यायलयासह जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये 12 डिसेंबरला लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी यात आपले दावे दाखल करून तडजोडीने मिटवून घ्यावेत असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने शनिवार (दि. 12) डिसेंम्बर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरूपाची तडजोड पात्र 5 हजार 249 प्रकरणे ठेवण्यात आले आहेत.

यामध्ये 286 दिवाणी, 3072 तडजोड पात्र फौजदारी, 67 मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, 326 कौटुंबिक वाद, भूसंपादनाची चार, 1138 एन आय ऍक्ट 138 ची प्रकरणे, 292 बँका वित्तीय संस्थांची प्रकरणे व 2 हजार 997 वित्तीय संस्थांची दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. आपापसातील वाद मिटविण्यासाठी या लोक अदालतीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय वाघवसे यांनी केले आहे.

न्यायालयात प्रलंबित प्रकरणांसह वित्तीय संस्था, शासकीय आस्थापना, टेलिकॉम कम्पनी, सहकारी संस्था यांनी दाखल पूर्व प्रकरणे 12 डिसेंम्बरच्या लोक अदालतीत ठेऊन सामंजस्याने तडजोड करून प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या