Tuesday, May 21, 2024
HomeनाशिकLok Sabha Election 2024 : नाशिक, दिंडोरी, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांत...

Lok Sabha Election 2024 : नाशिक, दिंडोरी, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांत ‘या’ दिवशी होणार मतदान

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजले असून देशात एकूण सात टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) आज पत्रकार परिषद घेत देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आता देशात १९ एप्रिल ते १ जून अशा सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यातील पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यांतील लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जूनला होणार आहे…

- Advertisement -

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) लोकसभेच्या मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे नेमके उत्तर महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कधी मतदान होणार? निकाल कधी लागणार? हे जाणून घेऊयात. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण आठ मतदारसंघ असून सध्या यातील धुळे, जळगाव, रावेर, नंदुरबार, दिंडोरी, अहमदनगर दक्षिण हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. तर नाशिक आणि शिर्डी हे लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Constituency) शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यानंतर आता या मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; महाराष्ट्रात १९ एप्रिलला मतदान, ४ जूनला मतमोजणी

त्यानुसार नाशिक, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होणार आहे. तर जळगाव, रावेर,नंदुरबार, अहमदनगर दक्षिण, शिर्डी, या लोकसभा मतदारसंघांत १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान देशात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार असून यात १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. तसेच यंदाच्या निवडणुकीत ४९.७ कोटी पुरुष तर ४१.१ कोटी महिला मतदार मतदान करणार आहेत. याशिवाय १.८२ कोटी नवीन मतदार मतदान करणार आहेत. तर ८२ लाख प्रौढ आणि ४८ हजार तृतीयपंथी देखील मतदान करणार आहेत. यासोबतच निवडणुकीसाठी देशभरात दीड कोटी निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून निवडणुकीसाठी ५५ लाखांपेक्षा अधिक EVM आणि साडे दहा लाख पोलिंग बूथ राहणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या