Saturday, July 27, 2024
Homeनाशिककाँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक जाहीर; पानगव्हाणे, आहेर, गायकवाड, डॉ.बच्छाव यांची नियुक्ती

काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक जाहीर; पानगव्हाणे, आहेर, गायकवाड, डॉ.बच्छाव यांची नियुक्ती

नाशिक | Nashik

आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) पूर्वतयारीच्या दृष्टीने मुंबई (Mumbai) येथे गुरुवार (दि.३ ऑगस्ट २०२३) रोजी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी, याकरिता राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय निरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला; एका जवानासह ६ जणांचा मृत्यू, काही भागात घरांची जाळपोळ

त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशावरून लोकसभा क्षेत्र निहाय निरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) चार प्रदेश पदाधिकारी यांच्याकडे चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे.

Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्याकडे नंदुरबार लोकसभा, माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश पदाधिकारी शरद आहेर यांच्याकडे ठाणे लोकसभा, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे धुळे लोकसभा व प्रदेश काँग्रेस सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तर नाशिक जिल्हयातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची वरिष्ठ निरिक्षक म्हणून तर डॉ. राजू वाघमारे व ब्रीज दत्त यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ट्रेन सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांना आला फोन; मुंबईत एकच खळबळ

तसेच वरीलप्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या लोकसभा निरिक्षक व समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी दि.७ ते १४ ऑगस्ट २०२३ यादरम्यान लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा निहाय दौरा व बैठकीचे नियोजन करण्यात येणार असून त्यासाठी त्या-त्या लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार व आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना विभाग व सेलचे जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांना बैठकीत निमंत्रित केले जाणार आहे.

दरम्यान, प्रदेश काँग्रेस कमिटीने (State Congress Committee) नियुक्त केलेल्या वरील सर्व पदाधिकारी यांचे नाशिक जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चंद्राच्या कक्षेत पोहोचताच Chandrayaan-3 चा अनोखा संदेश, “मी चंद्राचे…”

- Advertisment -

ताज्या बातम्या