Monday, July 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजलोकसभा निवडणूक २०२४ : सायं ५ वाजेपर्यंत देशात ५४.६८ टक्के मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ : सायं ५ वाजेपर्यंत देशात ५४.६८ टक्के मतदान

बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रत सर्वात कमी मतदान

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी आज देशातील आठ राज्यांसह महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदार संघात मतदान झाले. दरम्यान आज काही मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजेनंतर मतदान सुरु असल्याचे चित्र होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशातील ८ राज्यात सरासरी ५४.६८ टक्के मतदान झाले असून राज्यातील १३ लोकसभा मतदार संघात एकूण ४८.६६ टक्के मतदान झाल्याचे चित्र आहे.

आठ राज्यातील सरासरी मतदान टक्केवारी

बिहार – ५२.३५
जम्मू-काश्मीर – ५४.२१
झारखंड – ६१.९०
लडाख – ६७.७५
महाराष्ट्र -४८.६६
ओडिसा – ६०.५५
उत्तर प्रदेश – ५५.८०
पश्चिम बंगाल – ७३.००

महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी
भिवंडी – ४८.८९
धुळे – ४८.८१
दिंडोरी – ५७.०६
कल्याण – ४१.७०
उत्तर मुंबई – ४६.९१
मुंबई उत्तर मध्य – ४७.३२
मुंबई उत्तर पूर्व – ४८.३७
मुंबई उत्तर पश्चिम – ४९.७९
दक्षिण मुंबई – ४४.२२
मुंबई दक्षिण मध्य – ४८.२६
नाशिक – ५१.१६
पालघर – ५४.३२
ठाणे -४५.३८ टक्के

- Advertisment -

ताज्या बातम्या