नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi
लोकसभा निवडणूक २०२४च्या सहाव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ५८ जागांसाठी उद्या २५ मे रोजी मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
- Advertisement -
या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, मेनका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते आपले नशीब आजमावत आहेत. विशेषतः मेहबुबा मुफ्ती, मनेका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
या टप्प्यात बिहारच्या आठ, हरियाणाच्या सर्व दहा, झारखंडच्या चार, दिल्लीच्या सर्व सात, ओडिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या १४, पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू आणि काश्मीर च्या एका जागेवर मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे.