Friday, November 22, 2024
Homeनाशिकलोकसभा निवडणूक २०२४ : राज्यातील १३ मतदार संघात उद्या मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यातील १३ मतदार संघात उद्या मतदान

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी नाशिक, दिंडोरी,धुळे,भिवंडी,कल्याण,ठाणे,पालघर तर मुंबईतील सहा अशा १३ मतदार संघात मतदान होणार आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. १३ मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले असून. निवडणुकीचा शेवटचा टप्पा मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

एकट्या मुंबई शहरात ५ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २५ पोलीस उपआयुक्त, ७७ सहायक पोलीस आयुक्तांसह २५ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. याशिवाय ३ दंगल नियंत्रण पथके, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह केंद्रीय सुरक्षा दलाच्या ३६ तुकड्यांची अतिरिक्त कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे.

१३ मतदारसंघात १६० मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची मदत घेण्यात आली आहे.१३ मतदारसंघात एकूण २४ हजार ५७९ मतदान केंद्रे असून २ कोटी ४६ लाखांहून अधिक मतदार उद्याच्या मतदानासाठी पात्र आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या