Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला खासदाराचा मृतदेह

धक्कादायक! मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला खासदाराचा मृतदेह

मुंबई l Mumbai

मुंबईतील एका हॉटेलमध्ये अपक्ष खासदारांचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

दादर आणि नगर-हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर मुंबईमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. मुंबईतील मरीन ड्राइव्हच्या एका हॉटेलमध्ये खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

मोहन देलकर हॉटेलमधील ज्या खोलीत होते, तिथे गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट देखील पोलिसांना आढळून आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकर व दोन मुलं अभिनव व दिविता असा परिवार आहे. मोहन दलेकर यांनी सुसाइड नोटमध्ये काही बड्या लोकांची नावं असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ही सुसाइड नोट पोलिसांच्या ताब्यात आहे.

मोहन डेलकर यांनी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष निवडणूक लढवल्या आहेत. त्यांनी १९९१ आणि १९९६ मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर १९९८ च्या निवडणुकीत भाजपकडून विजय मिळवला. १९९९ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. २००४ मध्ये त्यांनी भारत नवशक्ति पार्टी नावाने पक्ष स्थापन केला आणि परत एकदा विजयी झाले. २०१९ मध्येही अपक्ष राहून विजयी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या