Monday, November 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूजलोकसभा निवडणूक २०२४ : राज्यातील निवडणूक प्रचाराला विराम

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यातील निवडणूक प्रचाराला विराम

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला शनिवारी विराम मिळाला. गेला महिनाभर सुरू असलेल्या प्रचारसभा, रोडशो, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय प्रचाराची सांगता आज झाली. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात २ कोटी ४६ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून २६४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

- Advertisement -

महायुती आणि महाविकास आघडीने शुक्रवारी अनुक्रमे शिवाजीपार्क तसेच बीकेसी मैदान येथे भव्य सांगतासभा घेतल्यानंतर शनिवारचा दिवस हा विभागाविभागात जाऊन थेट मतदारांशी संवाद साधणारा ठरल. यासाठी राेड शो, कोपरा सभा यावर भर देत नेते आणि उमेदवारांकडून मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले.

मुंबईतील ६ जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबईतील तीन मतदारसंघासह नाशिक, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात दोन शिवसेनेत सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडे आहे.मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ४ उमेदवार रिंगणात आहेत तर काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या