Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपेट्रोलपंपा वरुन पाच लाख लांबवले

पेट्रोलपंपा वरुन पाच लाख लांबवले

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

त्रिमुर्ती चौक जवळील दत्त मंदिर चौकात असलेल्या पेट्रोल पंप येथील कॅबीन मधील असलेल्या लॉकर मधुन अज्ञात चोरट्याने पाच लाख रुपये चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

या बाबत पोलिसांनी माहिती दिली, विश्वास घोरपडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली की,त्रिमुर्ती चौक जवळील दत्त मंदिर चौकात विशाल पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंप कार्यालयात कॅबीन आहे.

अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री कॅबीन मध्ये प्रवेश केला व कॅबीन मधील लॉकर मध्ये असलेले पाच लाख रुपये चोरुन नेले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या