Friday, June 21, 2024
Homeभविष्यवेधबुद्धीची देवता!

बुद्धीची देवता!

हातावरील शनी व रवीच्या बोटांच्या पेरातून खाली उतरलेली विद्वत्तेची सरस्वती रेषा डोळ्याने दिसत नाही इतकी ती छोटी व तलम असू शकते. हि विद्वता रेषा शोधण्यासाठी भिंगाचा वापर आवश्यक आहे. विद्वान रेषा दोन मिलीमीटर ते एक इंचा इतकी लांब असू शकते. सरस्वती किंवा विद्वत्ता रेषा एक किंवा दोनच्या संख्येने असू शकतात, अस्पष्ट, तिरकी, तुटक रेषा असता विद्वत्ता प्रखर नसते. श्रीगणेश बुद्धी प्रदान करणारा आहे. कुठल्याही पुजेच्या आधी गणपती पूजन होऊन नंतर ठरलेल्या पुजेच्या विधीला सुरवात होते. आजकाल विद्वत्ता असणे खूप गरजेचे आहे, विद्वान व्यक्ती सदा पुजनीय असतात. मग त्या कोणत्याही क्षेत्रात काम करीत असतील तरी त्या त्या क्षेत्रात त्यांना मोठा मान असतो. मानव जात उत्क्रातींच्या संक्रमणातून जात असताना मानवाला प्रदान केलेल्या बुद्धीच्या जोरावर तंत्रज्ञानात खूप मोठी उंची गाठली आहे. मानवाला प्रदान असलेला मेंदू इतर प्राणिमात्राला लाभला नाही. गणपतीची आराधना केल्याने, व्यक्तीच्या ठायी असलेल्या मूळ बुद्धिमत्तेच्या स्तरात आणखी वृद्धी होत असते, याचा माझा तर अनुभव आहे. शिवाय असंख्य व्यक्तींना याचा अनुभव आला आहे.परमेश्वराने जे बुद्धी कौशल्य दिले आहे किंवा सरस्वतीचा वरदहस्त दिला आहे त्यात गणपतीचीच आराधना केल्याने ज्या निद्रित जाणिवा जागृत होतात त्याचा फायदा व्यक्तीला झाल्याशिवाय रहात

- Advertisment -

ताज्या बातम्या