Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकनाशिकमधील इलेक्ट्रिक दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

नाशिकमधील इलेक्ट्रिक दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

पांडव नगरी परिसरातील (Pandav Nagari Area) असलेल्या इलेक्ट्रिक दुकानाला (Electric Shop) आज पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) आग (Fire) लागल्याने लाखो रुपयाचे इलेक्ट्रिकल साहित्य व फर्निचर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

पांडवनगरी परिसरात एका बंगल्यात दोन गाळे काढण्यात आले आहे. एका गाळ्यात किराणा दुकान प्रकाश कोतकर (Prakash Kotkar) हे चालवता आणि दुसऱ्या गाळ्यात आशापुरी नावाचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान अविनाश कोतकर (Avinash Kotkar) चालवितात (दि. 12) रोजी पहाटे शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली.

याआगीत लाखो रुपयाच्या इलेक्ट्रिक साहित्यासह फर्निचर जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात कर्मचार्‍यांना यश आले. अग्निशमन दलाचे जवान काजी, शिंदे, सोनवणे, गाडेकर यांच्यासह मुख्यालयातील अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या