पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
येथील जोपुळरोड (Jopul Road) याठिकाणी एका सोफ्याच्या फॅक्ट्रीला (Sofa Factory) आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आग (Fire) लागल्याची घटना घडली. तसेच या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे तीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे…
Nashik : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षण भिंतीवर आदळली, दोघांचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील जोपुळरोड येथे राहुल जंगम व सतीश झनकर यांचे श्री एंटरप्रायजेस नावाची सोफ्याची फॅक्ट्री असून या फॅक्ट्रीला आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाला (Fire Brigade) तात्काळ पाचारण करण्यात आले.
Irshalwadi Landslide : “अन् आई-बाबांना पळताही आले नाही…”; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम
यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर ओझर एअरफोर्सच्या (Ozer Air Force) अग्निशमन दलाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यानंतर तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत बचावकार्य करताना अग्निशमन अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, या आगीत जवळपास ३० लाख रुपयांचे सर्व सोफा बनविण्याचे साहित्य आणि सोफे जळून खाक (Burn Up) झाले आहे. तर त्याठिकाणी असलेली गॅसची टाकी वेळेवर काढल्याने स्फोट झाला नाही. मात्र, फॅक्ट्रीतील सर्व साहित्य जळून खाक झाले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
मोठी दुर्घटना! रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १०० हून अधिक लोक अडकल्याची भीती, पाच जणांचा मृत्यू