Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहिलेसोबत प्रेमसंबंध, गर्भपात, पतीचे नाव…; अनंत गर्जेंबद्दल धक्कादायक माहिती

महिलेसोबत प्रेमसंबंध, गर्भपात, पतीचे नाव…; अनंत गर्जेंबद्दल धक्कादायक माहिती

मुंबई | Mumbai
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्विय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे-गर्जेने आत्महत्या केली आहे. यावर्षी फेब्रुवारीतच या दोघांचे लग्न झाले होते. गौरी या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. गौरीने अचनाक टोकाचे पाऊल का उचचले याबाबत गौरीच्या आई-वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहे. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. पण त्यांचा संसार खुलायच्या आतच शेवट झाला.

आता या प्रकरणात मोठी अपडटे समोर येत आहे. मयत डॉ गौरीचे वडील यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती दिली आहे. अनंत गर्जे याचे एका किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत प्रेम संबंध होते. यातून संबंधित महिला गरोदर देखील राहिली होती. याबाबतचे काही कागदपत्रे गौरीला घरात सापडले होते. यात लातूर येथील एका गर्भवती स्त्रीचे समंतीपत्र आणि जाहीरनामा होता. यात पतीचे नाव म्हणून अनंत भगवान गर्जे असे नमूद होते. घराच शिफ्टींग करत असताना गौरीला ही कागदपत्रे आढळून आले होते. यानंतर गौरीचे पती अनंत गर्जेसोबत बिनसले.

- Advertisement -

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर अनंत गर्जे हा गौरीला ब्लॅकमेल करत होता, असेही गौरीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित प्रेमसंबंधाबद्दल घरच्यांना सांगू नको. ते घरी आले तर आपण चिठ्ठीत तुझे नाव लिहून आत्महत्या करेन, अशा प्रकारची धमकी अनंत गौरीला देत होता, असा मोठा खुलासा गौरीच्या वडिलांनी केला आहे. तसेच मुलीच्या आत्महत्येबद्दलही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. हा घातपात असू शकतो, याची सविस्तर चौकशी करावी, असेही त्यांनी तक्रारीत मागणी केली आगे.

“गौरीची एक मैत्रीण तिला दीड वर्षापासून ओळखते. फेब्रुवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यात बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या. म्हणजे तिला नेहमी मारहाण होत होती. हे जेव्हा कळते तेव्हा दु:खं होते. काय बोलावं हेच सुचत नाही आणि काल ती ड्युटीवर होती. एक वाजेपर्यंत ड्युटीवर होती. त्यानंतर घरी गेली. नंतर साडेसहाला हे घडले असेल तर त्या साडेपाच तासात काय झाले,” असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra News : उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा मंगळवारी मोर्चा; शासन निर्णय...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण (Sub Categorization) करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी राज्यभरातून पाच लाख...