Friday, September 20, 2024
Homeक्राईम‘लव्ह जिहाद’ प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

म्होरक्याला श्रीरामपूर येथून अटक

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

तालुक्याच्या पठारभागात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील (Love Jihad Case) म्होरक्यासह चौघांवर घारगाव पोलिसांनी (Ghargav Police) पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करत गजाआड केले आहे. तब्बल पाच वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष (Lure of Love) दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करुन अत्याचार केल्याचे जबाबातून समोर आले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मुख्य आरोपी शादाब तांबोळी याने सन 2020 पासून यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करुन प्रेमाचे आमिष (Lure of Love) दाखवत सलगी केली. याचा फायदा उठवून तांबोळी व चौघुले या दोघांनी पीडित तरुणीला फसवून मंचर (पुणे) (Manchar, Pune) येथे बोलावले. त्यानंतर चौघुले याच्या कारमधून मंचरवरुन लग्नासाठी चाकण येथे नेले. यासाठी तिला पाण्यातून काहीतरी गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. यावरच त्यांचा कारनामा थांबला नाही. त्यांनी तेथून पुन्हा दुसर्‍या वाहनाने मुंबईला (Mumbai) पाठवून दिले.

मुंबईत आल्यावर येथील अयाज पठाण याने सतत धमकावून तांबोळी आणि पीडित तरुणीला लॉजवर पाठवून दिले. तेथे तांबोळी हा तिला फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या घरच्यांना संपवून टाकेल अशी धमकी (Threat) देऊन अत्याचार केले. विशेष म्हणजे तिला न सांगता बळजबरीने लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्याचे पीडितेने जबाबात सांगितले. यावरुन घारगाव पोलिसांनी मुख्य आरेापी शादाब तांबोळी, सूत्रधार यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे व अयाज पठाण यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे.

दरम्यान, यातील म्होरक्या यूसुफ चौघुले याचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने श्रीरामपूर (Shrirampur) येथून अटक (Arrested) केली. त्यास न्यायालयात हजर केले असता 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याने बजरंग दलाने घारगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जात आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या